राज्यात कापसाची २० लाख क्विंटल खरेदी

राज्यात कापसाची २० लाख क्विंटल खरेदी राज्यात ‘सीसीआय’ आणि कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्याद्वारे तब्बल १०९ केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होत आहे.&nb नागपूर : राज्यात ‘सीसीआय’ आणि कापूस उत्पादक पणन महासंघ यांच्याद्वारे तब्बल १०९ केंद्रांच्या माध्यमातून कापूस खरेदी होत आहे. ‘सीसीआय’ने सुमारे १७.५० लाख क्विंटल तर पणन महासंघाने दोन लाख २२ हजार १६१ क्विंटल कापसाची खरेदी केली आहे महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाने या वेळी अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे केवळ ३० केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. जास्तीत जास्त ही संख्या ३६ पर्यंत नेण्याचे प्रस्तावित आहे >त्यापेक्षा अधिक केंद्र कोणत्याही परिस्थितीत सुरू केले जाणार नाही, असे पणन महासंघाने आधीच जाहीर केले आहे. सध्या पणन महासंघाकडून ३० केंद्रांवर खरेदी होत आहे. २७ नोव्हेंबरपासून पणन महासंघाने खरेदी सुरू केली. त्यानुसार आतापर्यंत दोन लाख २२ हजार १६१ क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ७५५९ शेतकऱ्यांकडून पणन महासंघाने पसाची खरेदी केली. गुरुवारी (ता. ३) एकाच दिवशी ७१९३ क्विंटल कापूस संकलन केंद्रावर पोहोचला. २२५६ शेतकऱ्यांकडून इतक्या कापसाची खरेदी करण्यात आली. त्यानंतर सलग सुट्टी असल्याने कापूस खरेदी बंद होती अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली. सोमवार (ता. ७) पासून खरेदी पूर्ववत होणार आहे. ‘सीसीआय’कडून १७.५० लाख क्विंटल खरेदी भारतीय कापूस महामंडळाने राज्यात टप्प्याटप्प्याने खरेदी सुरू केली. ‘सीसीआय’च्या केंद्राची संख्या राज्यात आता ७९ वर पोहोचली आहे. या माध्यमातून गुरुवारी (ता. ३) १.१५ लाख क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. ७५७५ शेतकऱ्यांकडून हा कापूस खरेदी करण्यात आला. ‘सीसीआय’ने राज्यात आजवर ७४ हजार ७५ शेतकऱ्यांकडून १७.५० लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे.

Leave a Comment: